अटकेला घाबरू नका, नामजप करा; सनातन प्रभातची सूचना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सनातन संस्थेच्या बंदीची मागणीही विरोधकांकडून होत आहे. संस्थेच्या साधकांवर व संस्थेवर 'राष्ट्रविरोधी संघटना' असा आरोप केला जात आहे. विरोधकांचे हस्तक कार्यालयाच्या आवारात किंवा साधकांच्या घरी आक्षेपार्ह वस्तू ठेवू शकतात, त्यामुळे अशा हस्तकांपासून सावध राहण्याचा इशाराही या सूचनेत दिला आहे. 

पुणे : सनातन प्रभात संस्थेने आपल्या संकेतस्थळावरून निरपराध हिंदूंना विनाकारण शिक्षा होत आहेत, कोणत्याही हिदूंच्या मनात आपल्यालाही अटक होईल अशी भिती असणे सहाजिक आहे, अशा वेळी घाबरू नका, नामजप करा अशा आशयाची पोस्ट सनातन प्रभातच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध केली गेली आहे. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येत हिंदूत्ववाद्यांचा समावेश असल्याचा, हत्यांचे कट हिंदुत्वावादी संघटनांनीच आखले असल्याचा आरोप होत आहे. नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला अटक केली. निरपराध हिंदूंना अटक होत असल्याने अनेकांच्या मनात भिती निर्माण होणे स्वाभविक आहे. त्यामुळे कोणीही न घाबरता कुलदेवतेचा जप व प्रार्थना करत रहावी, अखेर सत्याचाच विजय होतो, असे सनातनने आपल्या संकेतस्थळावरून सांगितले आहे. 

सनातन संस्थेच्या बंदीची मागणीही विरोधकांकडून होत आहे. संस्थेच्या साधकांवर व संस्थेवर 'राष्ट्रविरोधी संघटना' असा आरोप केला जात आहे. विरोधकांचे हस्तक कार्यालयाच्या आवारात किंवा साधकांच्या घरी आक्षेपार्ह वस्तू ठेवू शकतात, त्यामुळे अशा हस्तकांपासून सावध राहण्याचा इशाराही या सूचनेत दिला आहे. 

Web Title: Do not be afraid of the jail take a name of god notice of sanatam prabhat