नेहमीप्रमाणे सक्रीय राहू नका, आराम करा; भुजबळांना डॉक्टरांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

माझा आजार पूर्ण कमी झालेला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी मला नेहमीप्रमाणे सक्रीय राहू नका, असे सांगितले आहे. त्यांनी मला थोडा आराम करा आणि त्यांच्या देखरेखीखाली राहा, असा सल्ला मला दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.

मुंबई : माझा आजार पूर्ण कमी झालेला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी मला नेहमीप्रमाणे सक्रीय राहू नका, असे सांगितले आहे. त्यांनी मला थोडा आराम करा आणि त्यांच्या देखरेखीखाली राहा, असा सल्ला मला दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ यांना आज (गुरुवार) केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ''दोन महिन्यांपासून उपचार सुरु आहेत पण माझा आजार कमी झाला नाही. मला स्वादूपिंडाचा त्रास असल्याचे सिटीस्कॅनच्याद्वारे लक्षात आले. त्यानंतर मला केईएममध्ये दाखल करण्यात आले. अनेक डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले. त्यानंतर डॉक्टरांनी मला नेहमीप्रमाणे सक्रीय राहू नका'', असे सांगितले.

तसेच डॉक्टरांनी मला थोडा आराम करा आणि त्यांच्या देखरेखीखाली राहा, असा सल्लाही दिला आहे. आता यानंतरही मला रुग्णालयात अॅडमिट व्हावे लागणार आहे. माझ्यावर एकदोन शस्त्रक्रिया कराव्या लागण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. 

Web Title: Do not keep active as usual take relax Doctors advice to Bhujbal