शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : अजित नवले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

सरकारने शेतीमालाला हमीभाव आणि दुधाला योग्य भाव द्यावा. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल.

- अजित नवले, महासचिव, किसान महासभा

शिर्डी : शेतीविषयीच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान सरकारी तसेच खासगी मालमत्तांचे मोठे नुकसान होत आहे. या आंदोलनावर आज (मंगळवार) किसान सभेचे महासचिव अजित नवले यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळायला हवी. तसेच दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा नवले यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील काही शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. त्यावर आज नवले यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारने शेतीमालाला हमीभाव आणि दुधाला योग्य भाव द्यावा. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे 
दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात होणारा भाजीपाला व दुधाची रसद तोडण्यात येईल.

तसेच रविना टंडनने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, पांढऱ्या पेशी व मध्यमवर्गीय लोकांची शेतकऱ्यांकडे पाहण्याची भूमिका काय आहे, याच प्रतिनिधित्व करणार वक्तव्य हे रविना टंडन यांनी केले आहे. जे अन्न आपण खाता त्याला जागणार असाल तर माफी मागा, असे वक्तव्य करायला तुम्हाला शोभत नाही. एकदा आमच्या माऊलीसोबत शेतात राबा मगच शेतकऱ्यांच्या वेदना कळतील, असेही ते नवले म्हणाले. 

Web Title: Do not look at the end of the farmer patience says Ajit Navale