निवासी डॉक्‍टर बेमुदत रजेवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

धुळ्याच्या घटनेपाठोपाठ नाशिक आणि मुंबई येथील निवासी डॉक्‍टरांना मारहाणीची घटना घडल्या आहेत. एकीकडे, एकाच आठवड्यात निवासी डॉक्‍टरांवरील हल्ल्याच्या झालेल्या तीन घटना आणि दुसरीकडे, महाराष्ट्र निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेचा (मार्ड) बेमुदत बंद पुकारण्यावर न्यायालयाने घातलेल्या मर्यादा यातून मार्ग काढण्यासाठी बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

पुणे - सुरक्षेची हमी मिळेपर्यंत मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाठोपाठ पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर आजपासू (सोमवार) बेमुदत रजेवर जाणार आहेत. त्या बाबतचा निर्णय निवासी डॉक्‍टरांनी रविवारी रात्री घेतला. 

धुळ्याच्या घटनेपाठोपाठ नाशिक आणि मुंबई येथील निवासी डॉक्‍टरांना मारहाणीची घटना घडल्या आहेत. एकीकडे, एकाच आठवड्यात निवासी डॉक्‍टरांवरील हल्ल्याच्या झालेल्या तीन घटना आणि दुसरीकडे, महाराष्ट्र निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेचा (मार्ड) बेमुदत बंद पुकारण्यावर न्यायालयाने घातलेल्या मर्यादा यातून मार्ग काढण्यासाठी बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा करण्यासाठी सुरक्षित वातावरण नाही. त्यामुळे सुरक्षित वातावरणाची हमी मिळेपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय पुणे आणि मुंबईच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. प्रत्येक निवासी डॉक्‍टर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना बेमुदत रजेबाबत अर्ज देणार आहे. सोमवारी सकाळपासून ही बेमुदत रजा सुरू होईल, अशी माहिती ससून रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी दिली. 

याबाबत निवासी डॉक्‍टरांची रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. यात मार्ड कोणतीही भूमिका घेणार नाही. वैयक्तिक निवासी डॉक्‍टर हे स्वत: बेमुदत रजेचा अर्ज देणार आहेत.

Web Title: Doctor attacked at Sion Hospital, colleagues strike work