अरे देवा! मुंबईतून ४० डॉक्‍टर परतणार केरळला; कारण....

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना मदत मिळावी यासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केरळमधील ४० डॉक्‍टर आणि ३५ परिचारिकांचे पथक मुंबईत दाखल झाले होते; मात्र आता हे पथक अद्याप वेतन न दिल्याने घरी परतत आहे; तर ३५ परिचारिका पुढचे किमान सहा महिने मुंबईतच सेवा देणार आहेत.

मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना मदत मिळावी यासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केरळमधील ४० डॉक्‍टर आणि ३५ परिचारिकांचे पथक मुंबईत दाखल झाले होते; मात्र आता हे पथक अद्याप वेतन न दिल्याने घरी परतत आहे; तर ३५ परिचारिका पुढचे किमान सहा महिने मुंबईतच सेवा देणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळच्या एका वरिष्ठ मंत्र्यांशी पत्रव्यवहार करून आणखी काही परिचारिका मुंबईत पाठव्यावात अशी मागणी केली आहे. आत्तापर्यंत चार वेळा तारीख दिली गेली आहे; मात्र अजूनपर्यंत त्यांच्या वेतनाचा मुद्दा निकालात काढला गेला नसल्याची खंत व्यक्त करत २५ डॉक्‍टर गुरुवारी  (ता.१६) केरळला परतले; तर ३१ जुलैपर्यंत उर्वरित १५ डॉक्‍टरही माघारी जाणार असल्याची माहिती वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉ. संतोष कुमार यांनी दिली.

विद्यार्थ्यांनो, यंदा अॅडमिशनसाठी 'कट ऑफ' वाढणार; 'या' शाखेत प्रवेशासाठी चढाओढ!

महाराष्ट्र सरकारने केरळ सरकारला निवेदन दिल्यानंतर ९ जून रोजी डॉक्‍टर आणि ३५ परिचारिकांचे पथक केरळहून मुंबईत दाखल झाली होते. मुंबई महानगरपालिकेने तज्ज्ञ डॉक्‍टरांना दोन लाख रुपये, एमबीबीएस डॉक्‍टरांना ८० हजार रुपये आणि परिचारिकांना ३५ हजार रुपये वेतन देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यांना पैसे देत नाही किंवा प्रवास खर्चाची भरपाई करत नाही, अशी तक्रार या डॉक्‍टरांनी केली.

डॉक्‍टरांच्या पगाराबाबत आतापर्यंत चार वेळा तारीख दिली; मात्र अजूनपर्यंत वेतन दिलेले नाही.  प्रवासाचे पैसेही मिळाले नाहीत. एकूण ४० डॉक्‍टर केरळहून आले होते. २५ डॉक्‍टर उद्या जात आहेत तर उर्वरित डॉक्टर येत्या ३१ रोजी परत जाणार आहेत.
- डॉ. संतोष कुमार, वैद्यकीय पथकाचे प्रमुख (केरळ)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Return to Keral in mumbai