डॉक्‍टर संघटनाही झाल्या आता आक्रमक

मृणालिनी नानिवडेकर
Tuesday, 28 July 2020

खासगी रुग्णालये वाढीव शुल्क आकारत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची बाजू घेऊन नेते कायदा हातात घेत रुग्णालयात तोडफोड करत असताना डॉक्‍टर संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. वेळोवेळी बदललेल्या सरकारी निर्णयांचा आदर राखत कोरोनाग्रस्तांच्या सेवेत आम्ही स्वत:ला झोकून दिले. मात्र, आमच्या या कामाची योग्य दखल घेतली जात नसल्याची तक्रार डॉक्‍टर संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

मुंबई - खासगी रुग्णालये वाढीव शुल्क आकारत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची बाजू घेऊन नेते कायदा हातात घेत रुग्णालयात तोडफोड करत असताना डॉक्‍टर संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. वेळोवेळी बदललेल्या सरकारी निर्णयांचा आदर राखत कोरोनाग्रस्तांच्या सेवेत आम्ही स्वत:ला झोकून दिले. मात्र, आमच्या या कामाची योग्य दखल घेतली जात नसल्याची तक्रार डॉक्‍टर संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रथमतः डॉक्‍टरांनी सेवा देण्याचा निर्णय सक्तीचा करणे, त्यांनी सेवा द्याव्यात यासाठी नोंदणीची अट घालत प्रत्यक्षात तेथे योग्य तरतुदी न करणे, सेवेतील डॉक्‍टरांना वेतन न देणे, या तक्रारींबरोबरच आता रुग्णालये बंद करण्याचे धोरण राज्य सरकारने हाती घेतल्याची खंत डॉक्‍टर संघटनांनी व्यक्त केली आहे. 

पर्यटनाला तीन हजार कोटींचा फटका; लॉकडाउनचा परिणाम 

‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटन्स’ या संघटनेने डॉक्‍टरांना धाकदपटशा करण्यात येतो. रुग्ण दगावला तर मारहाण होते. देशात डॉक्‍टरांना मारहाण करण्यास प्रतिबंध असलेला कायदा असला तरी खासगी तसेच सरकारी रुग्णालयात रोषाचा बळी होणाऱ्या डॉक्‍टरांना संरक्षण नसल्याची खंत पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून व्यक्त केली आहे. 

चार लाख नागरिकांची चाचणी; पुणे विभागातील कोरोनाची स्थिती

‘कॉर्पोरेट रुग्णालये लादत असलेल्या दरांमुळे जनता वैतागली आहे. मात्र, छोट्या खासगी रुग्णालयांसाठी सरकारने निश्‍चित केलेले दर फारच कमी आहेत. पीपीई कीट्‌स, महागडी इंजेक्‍शन यांचा दर लक्षात घेतला तर सरकारने निश्‍चित केलेल्या दरात काहीही होत नाही. तरीही आमचे सदस्य रुग्णालये चालवतात, पण त्यांच्यावर होणारे अत्याचार दूर करा, रुग्णालये बंद करणे, जास्त दर आकारल्याचे दाखवत कारवाई करणे थांबवा,’’ अशी विनंती ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors associations have also become aggressive