डोंबिवलीतील बलात्कारानंतर पक्ष सरसावले

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह मनसे आमदाराने घेतली पोलिसांची भेट
बलात्कार
बलात्कारsakal

डोंबिवली, (जि.ठाणे) : डोंबिवलीत १५ वर्षीय मुलीवर २९ जणांनी अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनेची माहिती मिळताच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, भाजपच्या चित्रा वाघ व मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलिसांची भेट घेत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.

पोलिस त्यांचे काम चोखपणे करीत आहेत. दिल्ली प्रकरणानंतर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लवकर निकाल लावले जातात; मात्र आरोपींना शिक्षेचाही धाक राहिलेला नाही. गुन्हे करणाऱ्या आरोपींना महिलांच्या ताब्यात द्या, त्यांची गाढवावरून धिंड काढू, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. राजकीय पक्षातील काही जणांच्या मुलांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. या आरोपींना कोणत्याही पक्षाचे अभय मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. डोंबिवलीत १५ वर्षीय मुलीवर झालेली सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष महिला अधिवेशन भरविण्याची भाजपची मागणी योग्य होती. अजून किती महिलांवर बलात्कार झाल्यानंतर सरकारला जाग येणार, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला.

बलात्कार
पुणे : दुधाला प्रतिलिटर १ रुपया बोनस

कल्याण ग्रामीण हद्दीत दोन पोलिस ठाणी व्हावीत म्हणून सातत्याने पाठपुरावा करत आहे. २०१९ ला हिवाळी अधिवेशनात दिशा कायद्याचा मुद्दा मांडला होता. नंतर कोरोना काळात अधिवेशनच झाले नाही. शक्ती कायद्याचा मसुदाही तयार आहे; पण त्यावर चर्चा करण्यास सरकारला वेळ नाही. आता तरी सरकारने दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे,

- राजू पाटील, आमदार, मनसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com