Cylinder Price Hike | खाणंपिणं आणखी महागलं! घरगुती सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lpg gas cylinder price hike cooking gas will become expensive
खाणंपिणं आणखी महागलं! घरगुती सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

खाणंपिणं आणखी महागलं! घरगुती सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

इंधन दर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहेत. त्यातून ना चाकरमान्यांना दिलासा मिळतोय, ना गृहिणींना, ना व्यावसायिकांना. पेट्रोल-डिझेलच्या किमतीमुळे खिशाला चांगलाच फटका बसतोय. असं असतानाच आता घरगुती सिलेंडरचे दरही गगनाला भिडलेत. महागाईच्या या कालखंडात इंधन दराचा चढता आलेख कायम राहिला आहे. (LPG Cylinder Price Hike)

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आजपासून ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १४.२ किलोच्या एका सिलेंडरसाठी आजपासून ९९९.५० रुपये मोजावे लागणार आहेत. हे भाव आजपासूनच लागू होत आहेत. याआधी व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत १०२ रुपयांची वाढ झाली होती. १ मेपासून ही वाढ लागू झाली असून आता घरगुती सिलेंडरही ५० रुपयांनी महागला आहे.

हेही वाचा: LPG पुन्हा महागला; सिलेंडरच्या किंमतीत लक्षणीय वाढ

दरम्यान इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. यापूर्वी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यापासून कधीही घरगुती सिलेंडरच्या किमती वाढणार, अशी कुणकुण लागून राहिलेली होतीच. त्यानंतर आता ही मोठी दरवाढ झाली आहे. पूर्वी विनाअनुदानित गॅससाठी ९४० - ९७० रुपये मोजावे लागत होते. हे दर देशातल्या विविध भागांत वेगवेगळे आहेत.

Web Title: Domestic Lpg Cylinder Increased By 50 Rupees From Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top