साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे 

Aruna Dhere
Aruna Dhere

नागपूर : यवतमाळ येथे होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. निवडणुकीऐवजी निवड या प्रक्रियेतील त्या पहिल्या अध्यक्ष ठरल्या आहेत, हेही विशेष. 

साहित्य महामंडळाने यावर्षीपासून संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणुकीऐवजी निवड हा बदल जाहीर केला. निवडणुकीतील राजकारणामुळे या प्रक्रियेपासून व पर्यायाने पदापासून लांब राहणाऱ्या साहित्यिकांमध्ये डॉ. अरुणा ढेरे यांचाही समावेश होता. यंदाही त्यांनी आपले नाव सुचविण्यासाठी सुरुवातीला फारचा उत्साह दाखविला नव्हता. महामंडळाच्या बैठकीत डॉ. अरुणा ढेरे, प्रभा गणोरकर आणि डॉ. प्रेमानंद गज्वी या तीन नावावंर मतदान झाले. यात महामंडळाच्या कार्याकारीणीतील 19 सदस्यांपैकी 12 जणांनी अरुणा ढेरे यांच्या बाजुने मते टाकली. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर प्रभा गणोरकर आणि प्रेमानंद गज्वी होते. इंदूर येथे 2001 मध्ये झालेल्या 74व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विजया राजाध्यक्ष होत्या. त्यानंतर दरम्यानच्या काळात एकही महिला साहित्यिक संमेलनाध्यक्षपदी नव्हती.

प्रभा गणोरकर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या अधिकृत उमेदवार म्हणून 2014 मध्ये नशीब आजमावले होते. त्यावेळी ज्येष्ठ कवी फ.मू. शिंदे अध्यक्षपदी निवडून आले होते. यंदा निवड पद्धतीनुसार महामंडळाच्या घटक संस्थांकडून नावे मागविण्यात आली होती. त्यात पुन्हा एकदा प्रभा गणोरकर यांचे नाव सुचविण्यात आले. मात्र, डॉ. ढेरे यांची बहुमताने निवड झाली. वैचारिक पुस्तके, कथा व कवितासंग्रहांसह प्रभावी वक्तृत्वासाठी अरुणा ढेरे यांचा साहित्य क्षेत्रात नावलौलीक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com