इंदू मिलमधील स्मारक 2022 मध्ये पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई - दादर येथील इंदू मिलमधील सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकातील पुतळ्याचा चौथरा एप्रिल 2020 पर्यंत उभारला जाईल, तर 2022 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण होईल. वास्तुविशारद शशी प्रभू यांनी नुकतेच स्मारकाबाबत सरकारला सादरीकरण केले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यातील जमीन राज्य सरकारला दिली. पर्यावरण विभागाकडून परवानगी घेतल्यानंतर स्मारकाचे काम सुरू झाले आहे. जमीन हस्तांतर प्रक्रिया, आंदोलने असा प्रवास झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. 

इंदू मिलमधील स्मारकातील पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम 2020 पर्यंत पूर्ण होईल. चौथऱ्यापर्यंत लिफ्टने जावे लागेल. चौथऱ्यावरून संपूर्ण पुतळा दिसणार नाही. व्हिडिओग्राफी आणि पुतळ्यासोबत सेल्फी काढण्याची व्यवस्था चौथऱ्यावर केली जाणार आहे. देश-विदेशांतील पर्यटक आकर्षित होतील, अशा प्रकारे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकात डॉ. आंबेडकर यांचा आणखी एक 25 फूट उंचीचा पुतळा असेल. हा पुतळाही शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. 

चीनमध्ये साकारणार पुतळ्याचा साचा 
मूर्तिकार राम सुतार यांच्या आरेखनानुसार चीनमध्ये पुतळ्याचा साचा बनवला जात आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी चिनी तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे. पुतळ्यासाठी तांबे आणि अन्य धातूंचा वापर केला जाईल. दुरुस्तीसाठी पुतळ्याच्या आतून लिफ्ट बसवली जाईल. किमान 100 वर्षे टिकेल, अशा पद्धतीने पुतळा तयार केला जाणार आहे.

Web Title: Dr. babasaheb ambedkar memorial of Indu Milk completed in 2022