डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींना घेऊन पोलिसांचा पुन्हा घटनास्थळी तपास 

Dr. Dabholkar murder case Police took the accused to the spot and investigate
Dr. Dabholkar murder case Police took the accused to the spot and investigate

पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) पथकाने शनिवारी दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा ओंकारेश्‍वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर घटनास्थळी नेऊन तपास केला.

दाभोलकर यांची हत्या झालेल्या शिंदे पुलावरील घटनास्थळी एका आरोपीस नेऊन "सीबीआय'ने 31 ऑगस्ट रोजी दुपारी तपास केला होता. त्या वेळी "सीबीआय'च्या पथकाने कमालीची गुप्तता पाळली होती. त्यानंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासही "सीबीआय'ने याच ठिकाणी आरोपींना आणून पुन्हा एकदा तपास केला. आरोपींच्या पुण्यात येण्यापासून ते डॉ. दाभोलकर यांचा खून करून पुन्हा पलायन करण्यापर्यंतची इत्थंभूत माहिती पथकाने घेतली. या तपासाबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ होते. 

डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणात "सीबीआय'ने सचिन अंदुरे व शरद कळसकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. नालासोपारा स्फोटकप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शरद कळसकरला अटक केली होती. त्याच्या माहितीवरूनच "सीबीआय'ने अंदुरे यास औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास न्यायालयासमोर हजर केले. दरम्यान, एटीएसच्या ताब्यात असलेल्या कळसकर यालाही "सीबीआय'ने ताब्यात घेऊन शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com