बाळासाहेबांमुळे आमदार झाले - डॉ. नीलम गोऱ्हे

पत्रकार भवन, पुणे - ‘अपराजिता-डॉ. नीलम गोऱ्हे’ या सामाजिक चरित्रग्रंथाच्या निमित्ताने डॉ. गोऱ्हे यांची मुलाखत घेताना डॉ. शैलेश गुजर.
पत्रकार भवन, पुणे - ‘अपराजिता-डॉ. नीलम गोऱ्हे’ या सामाजिक चरित्रग्रंथाच्या निमित्ताने डॉ. गोऱ्हे यांची मुलाखत घेताना डॉ. शैलेश गुजर.

पुणे - वडिलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. त्यामुळे मी व्यावसायिक शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेमुळेच मी डॉक्‍टर झाले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आमदार.

विधान परिषद उपसभापती पदापर्यंतचा राजकीय व जीवनप्रवास शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका मुलाखतीदरम्यान उलगडला. शब्दमित्र आणि परिवर्तन संस्थेतर्फे ‘अपराजिता-डॉ. नीलम गोऱ्हे यांची संघर्षगाथा’ या अंजली कुलकर्णीलिखित सामाजिक चरित्रग्रंथाच्या प्रकाशनानिमित्ताने. डॉ. शैलेश गुजर यांनी त्यांची मुलाखत घेतली. ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार, शब्दमित्रच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. 

या मुलाखतीत त्यांनी अगदी आवडता रंग, खाद्यपदार्थ, अभिनेता, स्त्री आधार केंद्र स्थापन करण्यामागची भूमिका ते शिवसेनेत दाखल होईपर्यंतचा प्रवास सांगितला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले. त्या वेळी मी युक्रांदमध्ये काम करत होते. मी शिवसेनेत यावे, यासाठी ‘आम्ही पण चांगली माणसे आहोत. एकदा विश्‍वास ठेवून तर बघा’, असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे मी सेनेत गेले. तेथे बाळासाहेबांनी नेहमीच स्त्री आधार केंद्रांच्या कामाला पाठिंबा दिला. त्यांनी कधीही संघटनेच्या कामात राजकारण येऊ दिले नाही. या वेळी ‘अपराजिता’ या चरित्र ग्रंथातील काही भागांचे प्रा. डॉ. संदीप सांगळे, प्रतिमा जगताप, संगीता पुराणिक आणि कल्पना शिरोडे यांनी अभिवाचन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com