डॉ. साळुंखे, सचिन यांना दमाणी पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सोलापूर - येथील दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा कर्मयोगी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे व चित्रपट अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना जाहीर झाला आहे. 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे, अशी माहिती संयोजक बिपिनभाई पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता पुरस्कारांचे वितरण होईल. मराठी साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल डॉ. साळुंखे यांचा, तर कला क्षेत्रात 50 हून अधिक वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल पिळगावकर यांचा सन्मान करण्यात येत आहे. डॉ. साळुंखे यांनी मराठी विश्‍वकोशात धर्मशास्त्र, संस्कृत या विषयांत 100 हून अधिक लेख लिहिले आहेत. पिळगावकर कलाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांतही त्यांनी उल्लेखनीय भूमिका करीत स्वतःचे स्थान निर्माण केले.

Web Title: Dr. salunkhe sachin damani award