नाट्य चळवळ संपणार नाही - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मुंबई - नाटकांच्या माध्यमातून समाजमनाचे प्रतिबिंब उमटते. नवनवीन तंत्रज्ञान वापरून चित्रपटांकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी नाट्य चळवळ कधीही संपणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले. 

मुंबई - नाटकांच्या माध्यमातून समाजमनाचे प्रतिबिंब उमटते. नवनवीन तंत्रज्ञान वापरून चित्रपटांकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी नाट्य चळवळ कधीही संपणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले. 

राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे झालेल्या आठव्या थिएटर ऑलिम्पिक्‍सच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. कामगार क्रीडा भवनात झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय सांस्कृतिक कार्य, पर्यावरण, वन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, थिएटर ऑलिम्पिक्‍स थिएटर कमिटीचे अध्यक्ष थिओडोरस तेरझोपौलस, सदस्य रतन थियाम, थिएटर ऑलिम्पिक्‍स 2018 चे सल्लागार समितीचे अर्जुन देव चारण, अभिनेते नाना पाटेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक वामन केंद्रे आदी उपस्थित होते. 

""मी 16 वर्षांपासून नाटकापासून दूर आहे; मात्र "नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून मी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनांचे न लिहिलेले स्क्रिप्ट मांडत आहे'', असे पाटेकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक वामन केंद्रे यांनी केले, तर समारोप अर्जुन देव चारण यांनी केला. 

राजकारणातही नाटके करावी लागतात! 
मला ओरडून भाषण करण्याची सवय आहे. आज खालच्या स्वरात भाषण करण्याची सूचना नाना पाटेकर यांनी केली. त्यामुळे मी ओरडत नाही. मी या टेस्टमध्ये उत्तीर्ण झालो का, ते पाटेकरच सांगतील; पण आम्हाला राजकारणात नाटके करावी लागतात. पण खरे नाटक कोणते, खोटे कोणते, ते लोकांना समजते. संवेदनाहीन नाटक कधीही यशस्वी होत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Web Title: dramatic movement will not end - Chief Minister