Presidential Election 2022 | राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटणार; भाजपाचे स्पष्ट संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Draupadi Murmu
राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटणार; भाजपाचे स्पष्ट संकेत

राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मतं फुटणार; भाजपाचे स्पष्ट संकेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्रौपदी मुर्मू यांना २०० मतं मिळतील असं आश्वासन दिलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फुटणार अशा चर्चांना सुरुवात झाली. या चर्चांना बळ मिळेल, अशीच विधानं आता भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात केलेल्या विधानांमधून हेच दिसून येत आहे. (BJP leader Presidential Election)

मते फुटणार हा शब्दप्रयोग योग्य नाही. पार्टीच्या नेत्यांचा आदेश ऐकण्याऐवजी आज अंतरात्म्याचा आवाज ऐकला जाईल. २०० पेक्षा जास्त आमदार अंतरात्म्याचा आवाज ऐकून द्रोपदी मुर्मु यांना मतदान करतील, असा विश्वास भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तर पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रौपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली आहे.

हेही वाचा: Presidential Election 2022 LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल

तर मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानुसार, आम्ही कामाला लागलो आहोत. आमच्यासोबत कोण आहे हे सांगायचं नसतं. त्या गोष्टी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाच माहीत, अशी सूचक प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रतोद भरग गोगावले यांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना मिळणार आहेत, असं विधान गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही केलं आहे. आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे मतदान ही केवळ औपचारिकता आहे. आज राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीपेक्षाही कितीतरी पटीनं अधिक मते आमच्या बाजूनं पडतील. जे आधीच्या निवडणूकीत मतदानाकरता नव्हते ते सुद्धा आजच्या निवडणुकीकरता मतदान करतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: पक्षाचे आदेश झुगारून मविआचे आमदार मुर्मू यांना मतदान करतील - शेलार

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र भाजपा नेत्यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत. UPAचे सर्व आमदार यशवंत सिन्हा यांनाच मतदान करतील. २०० मते पडतील हा दावा त्यांचे कॅल्यक्युलेशन आहेत. अंतरात्माचा आवाज सर्वचजण ऐकतील, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) दिली आहे. तर यशवंत सिन्हा यांना व्यवस्थित मतदान होईल. ही कोणत्याही जातीधर्माची लढाई नाही लोकशाहीची लढाई आहे. काँग्रेसचे आमदार फुटणार ही अफवा असल्याचा दावा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे.

Web Title: Draupadi Murmu Presidential Election 2022 Yashwant Sinha Congress Ncp Bjp Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top