पिण्याच्या पाण्याचे टॅंकर पावसाळ्यातही सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले, तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई जाणवत असून, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्‍यात, तसेच सातारा जिल्ह्यात खटाव, माण तालुक्‍यातील 15 गावे आणि 75 वाड्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

साधारण उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून काही भागांत पाण्याचे टॅंकर सुरू केले जातात. मात्र, पावसाळा सुरू होऊन ऑगस्ट महिना संपत आला, तरी काही तालुक्‍यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरूच आहे. यंदा पुणे विभागात उन्हाळ्यात टॅंकरची संख्या तुलनेत जास्त होती. पुणे विभागात सध्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर वगळता पुणे आणि सातारा जिल्ह्यात 14 टॅंकर सुरू आहेत. त्यापैकी बारामती तालुक्‍यात तीन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच, दौंड आणि पुरंदर तालुक्‍यात प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहे. तसेच, खटाव तालुक्‍यात तीन आणि माण तालुक्‍यात सहा टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे विभागातील 25 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सध्या पाणीटंचाईची झळ बसत आहे. 

गतवर्षी ऑगस्ट महिन्यातील टॅंकरची आकडेवारी प्रशासनाकडून उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, पुणे विभागात गतवर्षी जुलैअखेरपर्यंत 228 टॅंकरद्वारे 239 गावे आणि 1531 वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत होता. ऑगस्टमध्ये त्यात काही प्रमाणात घट झाली होती. 

Web Title: Drinking water tankers continue in rainy season