अमली पदार्थ तस्करी रोखण्यास स्वतंत्र यंत्रणा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - अमली पदार्थांची तस्करी समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र यंत्रणा सुरू केली आहे. यात पाच विभाग आहेत. तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. कायद्यानुसार कडक कारवाई करून लवकरच यावर नियंत्रण आणण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. 

अमली पदार्थ तस्करांकडून मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याबाबतचा प्रश्‍न विधानसभा सदस्य बाबूराव पाचर्णे यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते. अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे तोडण्यात सरकारला यश आले आहे, असे पाटील म्हणाले. 

Web Title: drug trafficking