पुरामुळे ३९ हजार नागरिक गावांत अडकून

पुरामुळे ३९ हजार नागरिक गावांत अडकून

पुणे - कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे नऊ हजार आणि सांगली जिल्ह्यात सुमारे ३० हजार लोक अजूनही गावात अडकलेले आहेत. मात्र त्यांना बोटींद्वारे अत्यावश्‍यक वस्तूंची मदत पुरविण्यात येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे मृतांची संख्या २७ वरून २९ वर पोचली आहे. आतापर्यंत २ लाख ८५ हजार २६१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ७६ कोटींचा अग्रीम निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात पुणे जिल्ह्यासाठी पाच कोटी रुपये, सोलापूरसाठी एक कोटी, सातारा २० कोटी तसेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

पुणे विभागात आज महाबळेश्वर वगळता कोठेही अतिवृष्टी झालेली नाही. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पाणी पातळी दोन फुटांनी तर सांगली जिल्ह्यात ३ इंचांनी पाणी पातळीत घट झाली आहे. अलमट्टी धरणातून साडेचार लाख क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. तर, येवा ३ लाख ९० हजार क्‍युसेकपर्यंत आहे. अतिवृष्टी न झाल्यास पाणी ओसरण्यास मदत होईल.

मदतीचा ओघ वाढला
स्वयंसेवी संस्थांकडून आणि नागरिकांकडून मदतीचा ओघ वाढला आहे. परंतु, नागरिकांनी केवळ नवीन कपडे, बिस्किट पुडे, चहा पावडर, मॅगी, औषधे, टूथपेस्ट, साबण, टॉर्च, मेणबत्ती, काडीपेटी, सतरंजी, ब्लॅंकेट आणि पाण्याच्या बाटल्या याच वस्तू द्याव्यात. या वस्तूंचे वितरण विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.

पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात लष्कर आणि नौदलासह ४८ पथके, ६३ बोटी आणि ४८१ जवान कार्यरत आहेत. सांगली जिल्ह्यात ३२ पथके, ८५ बोटी आणि ५६९ जवान कार्यरत आहेत. सांगली जिल्ह्यात भिलवडी आणि सांगलवाडीसह इतर गावांमधील नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात येत आहेत.
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com