घटस्फोटितेशी विवाह केल्याने कुटुंब वाळीत     

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

लोणी - मुस्लिम समाजातील वाघवाले जमातीच्या लोहगाव (ता. राहाता) येथील जातपंचायतीने घटस्फोटित मुलीशी लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत लोणी पोलिसांत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आयेशा अली शेख (रा. बाभळेश्वर) हिने जातपंचायतीच्या सात जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. बाबन रहेमान पठाण, हबीब दगडू पठाण, बक्षण गुलाब पठाण, सैया हसन शेख (सर्व रा. प्रवरानगर), उस्मान हज्जूभाई पठाण, इमाम धोंडी शेख (दोघे रा. लोहगाव), गफूर बालम पठाण (रा. बाभळेश्वर) (सर्व वाघवाले) या सर्व जणांनी प्रवरानगर येथे बक्षण गुलाब पठाण यांच्या घरासमोर जातपंचायत भरविली. त्यामध्ये अली यांचे आई-वडील म्हणजे माझे सासू-सासरे यांना बोलावून सांगितले, की तुम्ही दंड भरला नाही, तर तुम्हाला वाळीत टाकले जाईल. नाइलाजास्तव माझ्या सासू-सासऱ्याने दीड लाख रुपये जातपंचायतीस दिले. मात्र, तरीही माझ्या कुटुंबीयांस गेल्या ६ वर्षांपासून जातीतून बहिष्कृत केले आहे. तसेच आमच्या लग्नातही त्यांनी अडसर निर्माण केला होता. त्यामुळे नाइलाजास्तव २०१३ मध्ये आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न केले. आमचे मूळचे गाव असलेल्या लोहगावमधून आम्हाला हाकलून दिले आहे, असे या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर आम्हाला आमच्या नातेवाइकांच्या लग्न अथवा अंत्यविधी कार्यात सहभागी होऊ दिले जात नाही. माझ्या मेव्हण्याच्या अंत्यविधीला मला जाऊ दिले नाही. जातपंचायतीच्या दबावामुळे आम्हास कुणासोबत बोलू दिले जात नाही.

या प्रकरणी लोणी पोलिसांत वरील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Due to marrying divorced family that family is in solidarity