पीडितेची जबाबदारी घेतल्याने बलात्काराच्या आरोपातून मुक्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणावर होता. त्याने पीडित मुलगी आणि तिच्या मुलाचा सांभाळ करण्याची हमी दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्याची आरोपातून मुक्तता करण्याचा आदेश दिला. या आरोपीविरोधात फसवणुकीचाही गुन्हा दाखल होता. 

मुंबई - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणावर होता. त्याने पीडित मुलगी आणि तिच्या मुलाचा सांभाळ करण्याची हमी दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्याची आरोपातून मुक्तता करण्याचा आदेश दिला. या आरोपीविरोधात फसवणुकीचाही गुन्हा दाखल होता. 

अल्पवयीन मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. या संबंधांसाठी तिची सहमती असली तरीही आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, आरोपीचे पीडित मुलीच्या चुलत बहिणीबरोबर लग्न होणार आहे, अशी माहिती असतानाही तक्रारदार मुलीने अशा संबंधांना सहमती दिली होती. आरोपीने लग्नाच्या भूलथापा दिल्या होत्या, असेही तक्रारीत म्हटले आहे. 
नागपूर सत्र न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील याचिका केली. याचिकेवर न्या. रवी देशपांडे आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आरोपीच्या विवाहाबाबत पीडितेला माहिती असूनही तिने अशा संबंधांना सहमती दिली. त्यामुळे भादंवि कलम 375 (6) (अल्पवयीन मुलीवर बलात्कार) आरोपीवर लागू होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. 

आरोपीने केले होते पलायन 
विशेष म्हणजे पीडित मुलगी गभर्वती असताना आरोपीने तिच्याबरोबर विवाह करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार विवाह सोहळाही निश्‍चित केला होता. मात्र, ऐनवेळी तो पळून गेला. त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीबरोबर विवाह केला. यामुळे फसवणुकीचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, संबंधित नवजात मुलाची आणि तक्रारदार तरुणीची आधीच्या पत्नीबरोबरच संपूर्णपणे देखभाल करण्याची हमी त्याने न्यायालयात दिली आहे. नवजात बाळाच्या नावावर बॅंकेमध्ये तातडीने 50 हजार रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने आरोपीला दिले आहेत. 

Web Title: Due to the responsibility of the victim, the rape charges are free