पूरग्रस्तांसाठी डुप्लिकेट मतदान ओळखपत्र - डॉ. दीपक म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मतदान ओळखपत्राला पर्याय

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • लायसन्स 
  • कार्यालयीन ओळखपत्र
  • पासबुक
  • स्मार्ट कार्ड 
  • मनरेगा जॉब कार्ड
  • आरोग्य विमा स्मार्ट कार्ड 
  • फोटोसह पेन्शन दस्तऐवज.

पुणे - पुणे विभागामध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या वेळी नवमतदार व दिव्यांग मतदारांची संख्या वाढली असून कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्त मतदारांसाठी ‘डुप्लिकेट मतदान ओळखपत्र’ देण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे विभागामध्ये तीन लाख ७८ हजार ८५६ इतक्‍या मतदारांची भर पडली आहे. १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या ९० हजार ७८२ झाली आहे. 

पूरबाधित कोल्हापूरमध्ये ६१, सांगली ४० व सातारा ३५ इतकी मतदान केंद्रे स्थलांतरित केले असून, सांगली (चार लाख ३५ हजार ४२२) व कोल्हापूरमध्ये  (एक लाख ५६ हजार ६०) मतदारांना ‘डुप्लिकेट मतदान ओळखपत्र’ दिले जाणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Duplicate Identity card for Flood Affected