भाजप विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आले तरी जनता भाजपच्या बाजूने: केशव उपाध्ये

नगरपंचायत निवडणूक निकालांदरम्यान केशव उपाध्येंनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर टीका केली आहे.
Keshav Upadhye
Keshav Upadhyesakal media

राज्यभरातील नगरपंचायतींच्या निवडणूका (Nagarpanchayat Election) नुकत्याच पार पडल्या. आज या निवडणुकांचा निकाल (Results) जाहिर होत आहे. अजूनही निकालांचं चित्र स्पष्ट झालं नसले तरी सध्याच्या निकालाच्या आकडेवारीच्या कलांनुसार सर्वपक्षीय नेते आपापल्या पक्षांच्या भुमिका मांडत आहेत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनीही या निकालादरम्यान महायुतीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेवर टिका केली आहे.

महाविकास आघाडीवर टीका करताना उपाध्ये म्हणाले की, भाजप (BJP) विरोधात 104 नगरपंचायत मध्ये तिन्ही पक्षाने एकत्र येऊन निवडणूक लढवली. तिन्ही पक्ष भाजप ला आव्हान देऊ शकतात आशा वल्गना केल्या. परंतु भाजपसोबत जनता आहे. निकाल अजून स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील सर्व भागात कोकण, प महाराष्ट्र विदर्भ येथे भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. नगरपंचायत निवडणूकीत भाजप एक नंबरचा पक्ष आहे. गेल्या 2 वर्षात प्रत्येक निवडणुकीत भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरला आहे.'' (During the Nagar Panchayat election results, Keshav Upadhyay has criticized NCP, Congress and Shivsena .)

Keshav Upadhye
पाली नगरपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी

सध्याच्या निकालांचे स्पष्टीकरण देत ते म्हणाले की, "कोकणात वैभववाडी, देवगडमध्ये भाजपने विजय मिळवला. कुडाळ मध्येही आम्ही जिंकलो. बीडमध्ये केज, शिरूर, पक्तवडा, आष्टी, नगरमधील अकोला, सांगलीत कडगाव, कम्युनिस्ट आमदार असल्या 2 ठिकाणी भाजपला यश मिळाले आहे. एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालं आहे.''

सत्ताधारी तिन्ही पक्षांनी साम-दम-दंड-भेद मार्ग अवलंबलापण, भाजप हीच नंबर 1 पार्टी आहे. 200 पेक्षा पण अधिक जागा भाजप ने जिंकल्या. विश्वजित कदम, धनंजय मुंडे, शंभूराजे यांना जोरदार धक्का देण्याचे काम केले, असं उपाध्ये म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com