दसरा का करतात साजरा, जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

विजयादशमीला मुहूर्त 
● 7 ऑक्टोबर दुपारी 12.38 मिनिटांपर्यंत महानवमी होती. त्यानंतर विजयादशमी लागली
● विजयादशमी 8 ऑक्टोबर दुपारी 2.51 मिनिटांपर्यंत असेल..
● विजयादशमीच्या दिवशी रवी योग आहे
● दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसला तर शुभ मानतात
● दसऱ्याला गंगा स्नानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून अनेक जण गंगेत किंवा जवळच्या नदीवर अंघोळ करतात

दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसरा किंवा विजयादशमी श्रीरामांच्या विजयाच्या रूपाने आणि दुर्गा मातेच्या पूजेच्या रूपात साजरा करण्यात येतो. अनेकजण याला रामाने केलेल्या रावणाच्या वधाच्या रूपात देखील साजरा करताय.

दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. स्पेशली म्हैसूर कुल्लू आणि सीकर इथला दसरा खास मानला जातो.. 

का करतात दसरा साजरा? 
पौराणिक कथांमध्ये श्रीरामांनी दहा तोंड असलेल्या रामाचा वध केला होता म्हणून दसरा साजरा करतात आणि म्हणूनच दहा तोंडी रावणाच्या पुतळ्याचं या दिवशी दहन केलं जातं. जेणेकरून आपण आपल्या स्वतःमधील क्रोध, भ्रम, ईर्षा, स्वार्थ,अन्याय आणि अहंकार यांचा नाश करू शकू..

शस्त्र पूजेची परंपरा
या दिवशी शस्त्र पूजा आणि नवीन कामे करायची परंपरा आहे. असं म्हणतात या दिवशी जी जी नवीन काम हाती घेतो ती पूर्ण होतात. प्राचीन काळात याच दिवशी राजे महाराजे युद्धासाठी निघत असत असं बोललं जातं. या दिवशी अनेक ठिकाणी जत्रेचं आयोजन केलं जातं. दसऱ्याचा सण हा दहा प्रकारची पापं म्हणजेच लालसा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, हिंसा आणि चोरी या गोष्टींपासून दूर राहण्याची प्रेरणा देतो.

विजयादशमीला मुहूर्त 
● 7 ऑक्टोबर दुपारी 12.38 मिनिटांपर्यंत महानवमी होती. त्यानंतर विजयादशमी लागली
● विजयादशमी 8 ऑक्टोबर दुपारी 2.51 मिनिटांपर्यंत असेल..
● विजयादशमीच्या दिवशी रवी योग आहे
● दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी दिसला तर शुभ मानतात
● दसऱ्याला गंगा स्नानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून अनेक जण गंगेत किंवा जवळच्या नदीवर अंघोळ करतात

 'म्हैसूर'ची जत्रा
भारतातच नाही तर जगभरात म्हैसूरची जत्रा खूप मोठ्या प्रमाणावर ओळखली जाते. साधारण 600 वर्षांपूर्वी इथे दसरा साजरा करण्यास सुरुवात झाली. इथल्या चामुंडी डोंगराच्या माँ चामुंडी देवीच्या पूजेनी इथे दसरा साजरा केला जातो. अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो मात्र काही अशी पण जागा आहेत जिथे रावणाच्या पुतळ्याचे दहन होत नाही..

सीकर
राजस्थानातील या जिल्ह्यात रावणाचा पुतळा दहन केला जात नाही. याठिकाणी रावणाच्या वेशातील व्यक्तीचा काल्पनिक वध केला जातो. या गावाची ओळख दसरा जत्रेचं गाव म्हणून केली जाते. दक्षिण भारतीय पद्धतीने होणाऱ्या जत्रेसाठी हे गाव प्रसिद्ध आहे..

कुल्लू 
कुल्लूमध्ये दसऱ्याला भगवान रघुनाथाची रथयात्रा निघते. ही रथयात्रा अनेक ठिकाणांहून फिरत फिरत जाते. इथे रावणाच्या पुतळ्याचे दहन करत नाहीत. दसऱ्याच्या पंधरा दिवस आधीच याची तयारी सुरू होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dussehara festival celebration in India