पूर्व विदर्भात हुडहुडी कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुणे - उत्तरेकडील थंडीची लाट आल्याने नागपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांसह पूर्व विदर्भाला हुडहुडी भरली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. आज (ता. २४) विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित राज्याच्या किमान तापमानात १ ते २ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची तीव्र लाट आहे. तर पूर्व विदर्भातही किमान तापमान घटल्याने थंडीची लाट आली आहे. रविवारी (ता. २४) नागपूर येथे राज्यातील नीचांकी ७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया, यवतमाळ येथे १० अंशांपेक्षा कमी तापमान नोंदले गेले.

रविवारी सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) - पुणे १३.५ (३), जळगाव ९.६ (-२), कोल्हापूर १८.१ (३), महाबळेश्‍वर १४.५ (१), मालेगाव १२.४ (१), नाशिक ११.२ (१), सांगली १५.२ (२), सातारा १५.१ (२), सोलापूर १७.३ (२),आैरंगाबाद १२.० (१), परभणी १२.१ (-२), नांदेड १३.० (१).

Web Title: East Vidarbha Cold Temperature Decrease