निवडणूक आयोगात आम्ही लाखो प्रतिज्ञापत्रे दाखल केली मात्र, ठाकरे गटाने...; CM शिंदे यांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक आयोगात आम्ही लाखो प्रतिज्ञापत्रे दाखल केली मात्र, ठाकरे गटाने...; CM शिंदे यांचा दावा

निवडणूक आयोगात आम्ही लाखो प्रतिज्ञापत्रे दाखल केली मात्र, ठाकरे गटाने...; CM शिंदे यांचा दावा

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे.

या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत त्यांनी आज कसबा पोटनिवडणूकीसाठी बैठका घेतल्या तसेच वेगवेगळ्या संघटना आणि शिष्टमंडळाशी बैठका घेतल्या त्यानंतर पत्रकरांशी बोलताना निवडणुक आयोगाच्या निर्णयावर म्हणाले.

निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि त्यांनी योग्यतेनुसार निर्णय घेतला आहे. आयोगाने सांगितल्या प्रमाणे आम्ही लाखो प्रतिज्ञापत्रे दाखल केली मात्र ठाकरे गटाने दाखल केलेली अनेक प्रतिज्ञापत्रे बोगस निघाली. असा दावा शिंदे यांनी केला.

तर पुढे म्हणाले मविआ सरकारच्या काळात बंद पडलेले अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, आम्ही केलेली कामे जनतेला दिसत आहेत. तर कसब्याच्या पोटनिवडणूकीवर म्हणाले, ब्राह्मण समाज नारज नाही विरोधी पक्ष जाणून बुजून संभ्रम निर्माण करत आहे.

दरम्यान चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीला न्यायालयाकडून अमान्य करण्यात आली. तसेच हे प्रकरण न्यायालयासमोर उद्या मांडण्यास सांगितले आहे.

टॅग्स :CM Eknath Shinde