अर्थव्यवस्था, रोजगाराची माहिती लपविली - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj-chavan
Prithviraj-chavan

मुंबई - देशात आर्थिक मंदी भयानक रूप धारण करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्था आणि रोजगारासंदर्भातील महत्त्वाची माहिती लपवून दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.

मोदी व फडणवीस यांनी अहंकार बाजूला ठेवून अर्थतज्ज्ञांचा सल्ला मान्य करावा; अन्यथा प्रचंड मोठ्या संकटाचा सामना जनतेला करावा लागेल, अशी भीती चव्हाण यांनी व्यक्‍त केली.

गांधी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी देशाच्या घसरत्या आर्थिक दराला केंद्र सरकारचे अहंकारी धोरण व बॅंकांमधील ७१ हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत असल्याचा आरोप केला.

मागील सलग सहा तिमाहीत विकासदर घसरत असून, ठप्प झालेली गुंतवणूक, व्याजदरकपातीचा शून्य परिणाम आणि कमी होत असलेले अप्रत्यक्ष करसंकलन (जीएसटी) याचा थेट परिणाम गंभीर आर्थिक मंदीत झाल्याचे चव्हाण म्हणले. 

देशात गुंतवणुकीबाबत नकारात्मक चित्र असून, व्याजदरकपातीचे कोणतेही फायदे प्रत्यक्षात दिसून येत नाहीत. या आर्थिक मंदीचा सर्वांत जास्त फटका उत्पादन क्षेत्राला बसला असून, पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात फक्त ०.६ टक्के वाढ नोंदवली आहे. अर्थव्यवस्थेच्या या चिंताजनक परिस्थितीमुळे देशभरात बेरोजगारीचे गंभीर संकट आले आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकार खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा दावा चव्हाण यांनी या वेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com