Ramdas Kadam: रामदास कदमांना मोठा धक्का; भावावर ईडीची मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam

Ramdas Kadam: रामदास कदमांना मोठा धक्का; भावावर ईडीची मोठी कारवाई

रामदास कदम यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. भाऊ सदानंद कदम यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. (ED action against Ramdas Kadam's brother Sadanand Kadam maharashtra politics )

सदानंद कदम यांना घेऊन ईडी मुंबईकडे रवाना झाली आहे. दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेनंतर रामदास कदम काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Congress: नाना पटोलेंना पुन्हा धक्का; राज्यातील 22 काँग्रेस पदाधिकारी हायकमांडच्या भेटीला

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं नसून रामदास कदम यांचा भाऊ सदानंद कदम यांचं असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता.

Accident : माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने दुचाकीस्वाराला उडवलं; थरारक CCTV Video आला समोर

साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी अनिल परब यांचंही नाव आलं होतं. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.

Shiv Sena : त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही; राज ठाकरेंच्या 'मनसे'ची राऊतांनी काढली लायकी

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. कदम यांच्या अटकेमुळं अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ramdas Kadam