कारवाईचा फास आवळणार! नवाब मलिकांच्या मुलालाही ईडीचे समन्स

Nawab Malik
Nawab Malik

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकाणामध्ये सध्या ईडीचे धाडसत्र सुरु आहे. गेल्या बुधवारी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पहाटे सहा वाजताच ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर चौकशीसाठी मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि सरतेशेवटी आठ तासांच्या चौकशी अंती त्यांना अटक करण्यात आली. यानंतर आता एक मोठी घडामोड समोर येत आहे. नवाब मलिक यांच्या मुलाला देखील ईडीने समन्स पाठवले आहेत. (Nawab Malik ED)

Nawab Malik
शिवरायांचे रामदास कधीच गुरु नव्हते, हाच खरा इतिहास : उदयनराजे

नवाब मलिक यांच्यावरील कारवाई सध्या सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com