ईडी बनलंय भाजपचं 'एटीएम'; संजय राऊतांचा गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

ईडी बनलंय भाजपचं 'एटीएम'; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी ही केंद्रीय तपास एजन्सी भारतीय जनता पार्टीसाठी (BJP) एटीएम मशिन बनली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (ED became BJP ATM machine says Sanjay Raut)

संजय राऊत म्हणाले, "१५ फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या चार वसूली एजंटबाबत मी सांगितलं होतं. यामध्ये किरीट सोमय्या हे पाचवे आहेत. ईडीच्या बड्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यातील एका अधिकाऱ्यानं युपीतील ५० उमेदवारांचा खर्च उचलला आहे. हे एक नेक्सस आहे. याचा अर्थ असा होतो की ईडी ही भाजपची एटीएम मशिन बनली आहे"

मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो की, ईडी आणि ईडीचे काही अधिकारी हे भाजपचे एटीएम मशिन बनले आहेत. त्यांच्या खडणीबाबतची सर्व कागदपत्रे मी पंतप्रधानांकडे पाठवली आहेत. मी पंतप्रधानांना २८ फेब्रुवारी रोजी १३ पानाचं पत्र लिहिलं असून यामध्ये मी त्यांना सांगितलं की, आपलं स्वच्छ भारत अभियान हे केवळ कचरा साफ करण्याची मोहिम नाही. यामध्ये भ्रष्टाचाराचा कचरा देखील साफ करायचा आहे. त्यामुळं देश तुमचा जयजयकार करत आहे. ज्या ईडीला आपण आपल्या राजकीय विरोधकांविरोधात पाठवलं आहे. अशा पत्राचे मी दहा भाग पंतप्रधानांना पाठवणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईडीचे काही अधिकारी आणि एजंट याचं एक नेटवर्क बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट्समधील लोकांना घाबरवण्याचं काम करत आहे. हे नेटवर्क कोरोडोंची खंडणी गोळा करत आहे. याची विस्तृत माहिती मी पंतप्रधानांना दिली आहे.

Web Title: Ed Became Bjp Atm Machine Says Sanjay Raut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top