अजित पवारांसह 'ईडी'कडून 71 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 September 2019

निवडणूकीच्या तोंडावर अजित पवारांसह इतर 71 जणांविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली : निवडणूकीच्या तोंडावर अजित पवारांसह इतर 70 जणांविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

या एकूण सर्वपक्षीय 70 नेत्यांचा समावेश आहे. राज्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना आज राज्य सहकारी बॅंकेच्या कथित घेटाळ्यावरून ईडीने काॅंग्रेस, राष्ट्रवादी,  भाजप शिवसेनेसह इतर पक्षातील 70 संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

सर्वच पक्षातील तत्कालीन मंत्री, आमदार, खासदारांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे ऐन निवडणूकीच्या रणांगणात ईडीचे अस्र बाहेर पडल्याने विरोधी पक्षामधे खळबळ उडाली असल्याचे बोलले जात आहे. या अगोदरच उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या सर्व संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या आरोपांची कसून चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला आपला अंतिम निकाल अलीकडेच जाहीर केला आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने नुकताच एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅकांचे तत्कालीन संचालक, पेण सहकारी बॅकेचे तत्कालीन संचालक व तत्कालीन संबंधित अधिकारी यांच्यासह तत्कालीन मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री व अन्य सरकारी अधिकाऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

No photo description available.

राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संचालक मंडळवावर कलम 88 नुसार नियमबाह्य कर्ज वाटप करण्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला आहे. यामध्ये हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, मधुकरराव चव्हाण, जयंतराव आवळे, दिलीप देशमुख, माणिकराव पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, मदन पाटील, अमरसिंह पंडीत, शेकापचे जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, पृथ्वीराज देशमुख, राजन तेली, प्रसाद तनपुरे, सुरेश देशमुख, शिवाजीराव नलावडे यांच्यासह गुलाबराव शेळके, पांडुरंग फुंडकर या दिवंगत राजकीय नेत्यांचा समावेश आहे.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED Files Money Laundering Case against Ajit Pawar and 71 leaders in Maharashtra Bank Scam