ED Raid: पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा! ईडीची छत्रपती संभाजी नगरमध्ये छापेमारी

काय घडलंय नक्की जाणून घ्या
ED Raid: पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा! ईडीची छत्रपती संभाजी नगरमध्ये छापेमारी

ED Raid in Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगर इथं पंतप्रधान आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ईडीनं शहरातील तीन ठिकाणांवर छापेमारी केली आहे. (ED is carrying out searches at Chhatrapati Sambhaji Nagar for fraud in PM Awas Yojana)

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्यावतीनं पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येत होती. या योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी टेंडर काढण्यात आले, पण या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलं होतं. महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या ही बाब समोर आणली होती. याप्रकरणी तीन कंत्राटदारांसह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता थेट ईडीचीच या प्रकरणात एन्ट्री झाल्यानं खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

काय आहे प्रकरण?

या योजनेसाठी टेंडर काढताना ती एकाच लॅपटॉपवरुन अर्थात एकाच आयपी अॅड्रेसवरुन निविदा भरण्यात आल्या. ही बाब प्रशासकांच्या नजरेस आल्यानंतर महापालिकेनं सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस, जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात महापालिकेची मोठी फसवणूक झाल्यानं पंतप्रधान आवास योजनेचा हा घरकूल प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com