राज ठाकरेंना ईडीची नोटीस; चौकशी होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली असून राज ठाकरे यांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली असून राज ठाकरे यांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोहिनुर प्रकरणात राज यांना ईडीची नोटीस आली असून ता. 22 ऑगस्टला उपस्थित राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

यापूर्वी राज ठाकरे यांनी मी ईडीला घाबरत नसल्याचे सांगितले होते.
मी ईडीला घाबरत नाही- राज ठाकरे

यापूर्वीच राज ठाकरे हे ईडीच्या कचाट्यात सापडले असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यावरून सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत का? अशा चर्चांना आणखीनच उधाण आले आहे.
राज ठाकरे ईडीच्या कचाट्यात?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED notice to MNS President Raj Thackeray