Jayant Patil: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पुन्हा 'ईडी'ची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Jayant Patil

Jayant Patil: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पुन्हा 'ईडी'ची नोटीस

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना पुन्हा ईडीने समन्स पाठवले आहे. २२ मे रोजी सोमवारी चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जयंत पाटील यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता.

आयएल अँड एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीने बजावली होती; परंतु जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी, असे पत्र जयंत पाटील यांनी ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत वाढवून घेतली होती.

जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ‘आयएल अँड एफएस’ प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी ‘कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. याच व्यवहारांबद्दल पाटील यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली असतनाही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधी या कंपनीप्रकरणी राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळल्याने पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

टॅग्स :Jayant PatilEDED Action