मुंबई, परभणीत ईडीचे छापे

मुंबई, परभणीत ईडीचे छापे

मुंबई - गंगाखेड शुगर अँड एनर्जी कंपनीच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबई व परभणी येथील १० ठिकाणी शोधमोहीम राबवली. याप्रकरणी ईडीने विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. कर्ज गैरव्यवहारप्रकरणी अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व इतरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत शोधमोहीम राबवली. गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईची मागणी केली होती. 

गुट्टे यांच्याशी संबंधित कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा उतारा, छायाचित्रे आदी बनावट कागदपत्रे तयार करून ३२८ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. आंध्र बॅंक, युको बॅंक, सिंडिकेट बॅंक, रत्नाकर बॅंक यांच्याकडून २०१२ ते २०१७ दरम्यान आठ हजार ते १० हजार शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या कर्जासाठी गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. कंपनी जामीनदार आहे. काही मृत शेतकऱ्यांच्या नावांवरही कर्ज घेण्यात आल्याचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com