Hasan Mushrif Ed Raid: राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड; काय आहेत आरोप? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif Ed Raid

Hasan Mushrif Ed Raid: राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड; काय आहेत आरोप?

राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी साडेसहा वाजता अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहचले आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर कागलमधील घरावर ईडीचे छापे पडले. जवळपास २० अधिकारी मुश्रीफांच्या घरी पोहचले आहेत.

या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

अप्पासाहेब नलवडे साखर कारखानाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखानातल्या १०० कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.

कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी छापेमारी मारण्यात आल्या. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी

जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती.

आयकर विभागानं केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागानं छापा टाकला होता.

टॅग्स :KolhapurNCPHasan Mushrif