शिक्षण, आरोग्य, पाणी, शेतीला हवे प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आगामी वर्षभरामध्ये राज्य सरकारने नेमक्‍या कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवा, यासंबंधाने ‘सकाळ’च्या राज्यातील बातमीदारांनी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यातून शिक्षण, आरोग्य, पाणी, शेती, सामाजिक सुरक्षेला सरकारला प्राधान्य द्यावा लागेल असा सूर पुढे आलाय. त्यातील ठळक मुद्दे असे  

शिक्षण
अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीत बदल आवश्‍यक
गुणवत्ता पूर्ण शिक्षण, उच्च शिक्षणातील नवीन प्रवाह ओळखून विद्यापीठ, महाविद्यालये व शाळा अधिक आधुनिक करणे गरजेचे 
आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम लागू करून परीक्षा पद्धतीत सुधारणा व्हावी
सरकार, औद्योगिक व वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्ध करून भौतिक विकासासह संशोधनावर हवा भर
अध्ययनाच्या जोडीलाच रोजगार, स्वयंरोजगार निर्मितीवर भर देणे हवा
नावीन्यपूर्ण रोजगारक्षम अभ्यासक्रमांची निर्मिती महत्त्वाची 
उच्च व तंत्रशिक्षणविषयक धोरण शालेय शिक्षणापासून राबवावे 
संशोधन, इनोव्हेशन, शैक्षणिक विकासाचे अधिक उपक्रम राबवण्याचे पेलावे लागेल आव्हान 
दिवसागणिक बदलणाऱ्या धोरणातून अस्थिर झालेल्या शालेय शिक्षणाला द्यावी लागेल स्थिरता

आरोग्य
वेलनेस सेंटरची संकल्पना चांगल्या पद्धतीने राबवावी
आजार कमी करण्यासाठी निधी अधिकचा द्यावा
आयुष्यमान भारत ही योजना लांबपल्याची असल्याने निधीत राखावे सातत्य
ग्रामीण रुग्णालयाच्या सशक्तीकरण आणि शस्त्रक्रियांच्या माध्यमातून आरोग्य सेवेतील ‘गॅप’ भरून काढावी
वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा हे विभाग एकत्र करून प्राध्यापकांना डॉक्‍टर आणि डॉक्‍टरांना प्राध्यापक होता येईल, असे स्वीकारावे धोरण
रक्तक्षयावर लोह गोळ्यांचा मारा करण्यापेक्षा राजगिऱ्याचा लाडू, खजूर- तूप, मूगडाळीची खिचडी असे घरगुती उपायांसंदर्भात जनजागृती करावी 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, वैद्यकीय उपचार सामान्यांच्या आवाक्‍यात यायला हवेत

शेती
कोरडवाहू क्षेत्रात वर्षभरात एक पीक घेता येईल अशी सिंचन व्यवस्था हवी
खरीप व रब्बी पिकांसाठी वेळेवर पतपुरवठा व्हावा. तोही कमी व्याजदराने आणि सुलभ पद्धतीने  
उत्पादकता वाढीबरोबरच हवामान बदल हा घटक महत्त्वाचा मानून त्यानुसार नियोजन व्हावे
हमी भावाच्या पुढे जाऊन ‘मार्केटिंग’ व्यवस्थेच्या बळकटीकरणाला विशेष महत्त्व दिले जावे
प्रक्रिया उद्योगाची सक्षम साखळी उभारत त्यादृष्टीने लवचिक धोरण स्वीकारावे 
आयातीवर अवलंबून राहण्याऐवजी निर्यातक्षम शेतमालाच्या निर्यातीत सातत्य राहावे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा व्हावा

पाणी
राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पातून महाराष्ट्राला हक्काचे पाणी मिळावे
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात यावेत
पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबकची सबसिडी वेळेत पदरात पडावी
मागेल त्याला शेततळे ही योजना अधिक गतिमान करावी.
पाणलोटनिहाय पाण्याचा ताळेबंद मांडून उपलब्ध पाण्यानुसार पीकपद्धतीचा अवलंब व्हावा
जलयुक्त शिवारांतर्गत लहान कामे करावीत, ठेकेदारांचा बंदोबस्त करावा
जलसंधारणाच्या कामांसाठी पावसाळ्यापूर्वी नियोजन आवश्‍यक
नद्यांच्या भौगोलिक रचनेनुसार कामे घ्यावीत

सामाजिक सुरक्षा
महिलांवरील अत्याचारावर आणावे लागेल नियंत्रण
मुले-मुलींच्या संगोपनाला विशेष महत्त्व देत त्यादृष्टीने सामाजिक मन करण्याची गरज
कमी कष्टात अधिक पैसे मिळवण्याच्या नादात अपहरण, खंडणीच्या वाढलेल्या प्रकारांवर टाच आणावी लागेल
सोशल मीडियावर नियंत्रण आणि छोट्या शहरांचा विकास 
राज्यातील जातीय सलोख्याच्या चिंतेच्या बनलेल्या विषयाची तड लागावी 
अफवांवरील नियंत्रण आणण्याबरोबर समाजकंटकांच्या मुसक्‍या आवळल्या जाव्यात

Web Title: Education health water agriculture must be a priority