आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई  - सरकारने पुन्हा अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत आणखी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या. वैद्यकीय शिक्षण व औषध प्रशासनचे अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्याकडे महसूल व वन विभागाचा कार्यभार सोपवला आहे, तर गाडगीळ यांच्या रिक्‍त जागी आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांची नेमणूक करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या सचिव म्हणून मनीषा वर्मा यांच्याकडे कार्यभार दिला आहे. मिता राजीव लोचन यांची "रुसा'च्या प्रकल्प संचालकपदी नेमणूक केली आहे. रोहयो, ग्रामविकास व जलसंधारणाचे सचिव पी. एन. भापकर यांची बदली औरंगाबाद विभागीय आयुक्‍तपदी करण्यात आली आहे.

मुंबई  - सरकारने पुन्हा अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत आणखी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या. वैद्यकीय शिक्षण व औषध प्रशासनचे अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्याकडे महसूल व वन विभागाचा कार्यभार सोपवला आहे, तर गाडगीळ यांच्या रिक्‍त जागी आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांची नेमणूक करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या सचिव म्हणून मनीषा वर्मा यांच्याकडे कार्यभार दिला आहे. मिता राजीव लोचन यांची "रुसा'च्या प्रकल्प संचालकपदी नेमणूक केली आहे. रोहयो, ग्रामविकास व जलसंधारणाचे सचिव पी. एन. भापकर यांची बदली औरंगाबाद विभागीय आयुक्‍तपदी करण्यात आली आहे. महिला व बालविकास आयुक्‍त के. एम. नागरगोजे यांच्याकडे राज्य कृषी, शिक्षण व संशोधन संस्थेच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. पुण्यातील जमाबंदी उपसंचालक एस. एस. डुंबरे यांची बदली अतिरिक्‍त विभागीय आयुक्‍त, पुणे या पदावर करण्यात आली आहे. पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एल. एस. माळी यांच्याकडे महिला व बालविकास आयुक्‍तपदाचा कार्यभार सोपवला आहे. 

Web Title: Eight IAS officers transferred