स्कॉर्पिओच्या अपघातात आठ जण जखमी; दोघे गंभीर

सुनील गर्जे
रविवार, 30 डिसेंबर 2018

नेवासे :  नेवासे फाट्याकडून नगरच्या दिशेने जात असलेली स्कॉर्पिओ नेवासे फाट्यानजीक नगर रोडवर दुभाजकावर जाऊन पलीकडच्या टेम्पोला धडकली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

नेवासे फाट्याकडून नगरकडे लग्न समारंभ आटोपून जाणारी स्कॉर्पिओ क्रमांक एमएच १६ एएस ४४५५ ही वाहनांच्या लाईटचा अंदाज न आल्याने दुभाजकावर सरळ घुसल्याने सुमारे ५० फूट त्यावर जाऊन नगरकडून औरंगाबादकडे जाणारा टेम्पो क्रमांक एमएच ४१ जी ७३२८ याला धडकली. स्कॉर्पिओमधील सर्व आठ जण जखमी झाले असून, हे सर्व पाथर्डी तालुक्यातील मांडवा येथील आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे

मेजर दीपक वाळके, सतिष लावंड, मीना लावंड, रीना ठोंबरे सेवानिवृत्त सैनिक  म्हातारदेव ठोंबरे, प्रियांका ठोंबरे, चालक (नाव माहीत नाही) या सहा दोन लहान मुले होती. अपघात होऊन पोलिस अर्ध्या तासाने पोचले. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्या होता.

स्थानिक युवकांच्या मदतीने रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. जखमी रुग्णांना नेवासे फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये तर काहींना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मदतीच्या बहाण्याने बॅग पळवली 

दरम्यान, अपघातग्रस्तांना मदत करतेवेळी स्कॉर्पिओमधील सुटकेसही गर्दीत लांबविली. मदतीच्या बहाण्याने असे अनेक चोरीचे प्रकार वाढत आहे. गर्दीचा फायदा घेत वाहनातील सर्व साहित्य चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहे.

Web Title: Eight people injured in Scorpio accident Two Critical