Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह आठ हजार सभासद ठरणार अपात्र; वाचा प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anna Hazare

Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह आठ हजार सभासद ठरणार अपात्र; वाचा प्रकरण

पारनेर: पारनेर तालुका सैनिक बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी चार हजार १९८ सभासदांची प्रारूप यादी प्रसिध्द केली. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी २९ मे रोजी ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यात सात जून पर्यंत हरकतींसाठी मुभा असून १९ जूनला हरकतींवर निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यानंतर (ता. २६) जूनला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

सैनिक बँकेचे १२ हजार सभासद होते. मात्र बँकेने पोटनियमात दुरुस्ती केल्याने त्यातील जवळजवळ आठ हजार संस्थापक सभासद कमी झाले आहेत. ज्या सभासदाचे शेअर्स एक हजार पेक्षा कमी आहेत व ज्या सभासदाची पाच हजार रुपयांची मुदत ठेव पावती नाही अशा सभासदांना आपात्र ठरविले आहे.

बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व काही भ्रष्टाचारात गुंतलेले कर्मचाऱ्यांनी केलेला गैरव्यवहार झाकावा म्हणून बँकेत स्वत:च्या मर्जीतील संचालक मंडळ यावे म्हणून संस्थापक तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह आठ हजार सभासदांना निवडणुकीच्या प्रक्रियेपासून लांब ठेवले आहे,

अशी टीका बाळासाहेब नरसाळे व विनायक गोस्वामी या बँकेचे सभासदांनी केली. वास्तविक बँकेने संबंधीत सभासदांना नोटीस देऊन कळविणे गरजेचे होते. या निर्णया विरोधात आम्ही उच्च न्यालायात जाणार आहोत, असेही नरसाळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

बँकेचे संस्थापक तथा ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनाही उपविधी दुरुस्तीच्या नावाखाली अपात्र ठरविण्यात आले आहे. सुरवातीच्या काळात आठ हजार सभासदांनी १०० रुपये शेअर्स घेत बँकेचे भाग भांडवल उभे केले. संचालक मंडळाने आपण पुन्हा सत्तेत येणार नसल्याचे लक्षात आल्यावर एकाच दिवसात १४०० सभासद वाढविले व जुने सभासद मतदानास अपात्र ठरावेत म्हणून उपविधी दुरुस्त केली.

- विनायक गोस्वामी