रोहिणी खडसे, पंकजा मुंडेंच्या पराभवाबाबत खडसेंनी केला मोठा खुलासा!

वृत्तसंस्था
Tuesday, 3 December 2019

पक्षातील कुरघोड्यांमुळेच हार मानावी लागली असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. केवळ मीच नाही तर पंकजा यांचे समर्थकही हेच सांगतील असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जळगाव : विधानसभेच्या निवडणूकीत भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना धक्का बसला आहे. तर काही जणांना पक्षातील कुरघोंड्यांनाच सामोरे जावे लागले व त्यामुळे निवडणूकीत पराभव स्विकारावा लागला. अशाच प्रकारचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. रोहिणी खडसे व पंकजा मुंडे यांना पक्षातील कुरघोड्यांमुळेच हार मानावी लागली असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. केवळ मीच नाही तर पंकजा यांचे समर्थकही हेच सांगतील असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Chandrayaan 2 : मोठी बातमी! विक्रम लँडर सापडला, नासाने केले फोटो ट्विट

Image result for eknath khadse

भाजपतील विधानसभा निवडणूकीला उभे राहिलेल्या उमेदवारांच्या विरोधात कुरघोड्या करणाऱ्यांची नाव माझ्याकडे आहेत, ही नावे वरिष्ठांकडे पाठवून त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परळीतही पंकजा यांचा थेट पराभव झाला नसून, पक्षातील लोकांच्या कारस्थानामुळेच त्यांना हार मानावी लागली. तर काही लोकांनी त्यांच्या विरूद्ध उभ्या असलेल्या धनंजय मुंडे यांना मदत केल्याचा आरोपही खडसेंनी केला. तर रोहिणी खडसेंविरोधात तर काही भाजप कार्यकर्त्यांनी उघडपणे काम केले आहे. त्यांची नावे मी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना पाठवली असून, आता मी कारवाईची वाट बघत आहे, असे खडसे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मागील दोन दिवस भाजप नेत्या व दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचे नाराजीनाट्या सुरू आहे. फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांना 12 डिसेंबरला मी तुमच्याशी बोलायला येणार आहे, असे सांगितले. यावरून त्या काहीतरी मोठा निर्णय घेतील अशी चर्चा सुरू आहे. तर काल त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून आपले पद व भाजपचे नाव हटविले आहे. यावरू त्यांच्याशी काही चर्चा झाली का विचारले असता, पंकजांशी माझे यावर बोलणे झाले नाही, असे खडसेंनी सांगितले. मी शिवसेनेत गेलो, तर तुम्हाला सांगून जाईन, अफवांवर विश्वास ठेवू नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

पंकजा मुंडेंच्या ट्विटला उद्धव ठाकरेंचे उत्तर, म्हणाले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse gives statement on Rohini Khadse and Pankaja Munde defeat in assembly elections