BREAKING: पवारांच्या भेटीनंतर खडसे महाराष्ट्रातील 'या' मोठ्या नेत्याच्या भेटीला!

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 9 December 2019

भारतीय जनता पक्षामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (ता.०९) सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर मात्र एकनाथ खडसे हे शिवसेनापक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (ता.०९) सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर मात्र एकनाथ खडसे हे शिवसेनापक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप   

एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे एकनाथ खडसे हे नेमके काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलेच असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता खडसे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला; वेगळी भूमिका घेणार?

एकनाथ खडसे हे आज दिल्लीत होते, दिल्लीत त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ते भाजपचे नेते भूपेंद्र यादव यांचीही भेट घेणार होते. परंतु भाजप पक्षश्रेष्ठींसोबतच यादव यांनीही त्यांची भेट नाकारल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse meet to Uddhav Thackeray after he meets Sharad pawar