
Karnataka Election 2023 : "स्वत:चं घर जळालं ते आधी वाचवा" ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला!
Karnataka Election 2023: सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर आहेत.'शासन आपल्या दारी' या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांनी केला.
शिंदे म्हणाले मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. विरोधकांना सुप्रीम कोर्टाने चपराक दिली. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, असे शिंदे म्हणाले. घटनाबाह्य बोलणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केलं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम चालू केला आहे. गोर गरींबाना न्याय देणारं हे सरकार आहे, असे शिंदे म्हणाले.
कर्नाटकमधील निवडणूक निकालांवर देखील शिंदे यांनी भाष्य केलं. कुणाला कधी आनंद वाटतो कळत नाही. दुसऱ्याचे घर जळताना काही लोक आनंद व्यक्त करक आहेत. मात्र स्वत:चं घर जळालं ते आधी वाचवा. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना, असा टोला एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेतला लगावला.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
दक्षिणेचा पट्टा भाजपच्या हातून निसटला आहे. भाजपला कर्नाटकात नाकारलं आहे. भाजप फोडाफोडीचे राजकारण करतंय, हे लोकांना आवडलेले नाही. कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातून घालवू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.