मुख्यमंत्री म्हणाले, भाजप सत्तेसाठी वाटेल ते करेल असे वाटत असताना... | Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde BJP support Balasaheb Thackeray Shiv Sena

मुख्यमंत्री म्हणाले, भाजप सत्तेसाठी वाटेल ते करेल असे वाटत असताना...

मुंबई : भाजप (BJP) सत्तेसाठी वाटेल ते करेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, भाजपने बहुमत असताना शिवसेनेला पाठिंबा दिला व एकनाथ शिंदेला पाठिंबा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मोठेपणा दाखवला. भाजपकडे १२० संख्याबळ असताना मला मुख्यमंत्री केले. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना म्हणून भाजपने पाठिंबा दिला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असो, रखडलेले प्रकल्प असो हे सर्व मार्गी लावण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हा सरकारचा अजेंडा आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा: उपमुख्यमंत्री फडणवीस ओबीसींसाठी कुठली जादूची कांडी फिरवणार?

महाराष्‍ट्रातील जनतेला अपेक्षित असलेले सरकार स्थापन झाले आहे. राज्याला स्थिर आणि मजबूत सरकार मिळाले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे घेऊन जात आहे. बाळासाहेबांनी कधीही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले नसते. शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांवर अन्याय होऊ लागल्याने अस्तित्वाची लढाई सुरू झाली, असेही मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत की नाही यावर आता काहीच बोलणार नाही. योग्य वेळ आल्यावर उद्धव ठाकरे यांना उत्तर देईल. निधी मिळाला नाही, सन्मान मिळाला नाही म्हणून आमदारांनी बंड पुकारला. शिवसेनेच्या आमदारांनी बंड का पुकारला याचा विचार करायला हवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा: नूपुर शर्मावरील टिप्पणी मागे घ्यावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

आमदारांना ईडीची नोटीस आली नव्हती

बंड पुकारलेल्या ५० आमदारांना ईडी किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आली नव्हती. ते स्वतः माझ्यासोबत आले. त्यामुळे ईडीची भीती दाखवून त्यांना बंड करण्यास भाग पाडले असे म्हणणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

Web Title: Eknath Shinde Bjp Support Balasaheb Thackeray Shiv Sena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..