Janmashtami| दहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde government will give free treatment to all injurd govindas in hospital

दहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार

देशासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंद पथकांना दिलेल्या सोयी सुविधांमध्ये आणखी एक मोठी घोषणा केली आहे. गोविंदांना दहिहंडी फोडताना दुखापत झाल्यास अशा गोविंदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत काल, गुरुवारीच विधानसभेत घोषणा केली होती. (Eknath shinde government will give free treatment to all injurd govindas in hospital)

राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: दहीहंडी उत्सवात मराठी चित्रपटसृष्टीची उलाढाल तीन ते पाच कोटी रुपयांची

मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं. ते म्हणाले, दहिहंडीवेळी जर एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर त्याला शासनाकडून १० लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच जर एखादा गोविंदा जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये, अपघातात अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.

हेही वाचा: mpsc वाली मुले गोविंदा पथक जॉइन करणार ? इंटरनेटवर मिम्सचा पाऊस

तसेच, गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन 'प्रो गोविंदा' स्पर्धा राबवण्यात आली आहे. इतर खेळांप्रमाणं या गोविंदांदेखील शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के कोट्याचा लाभ घेता येईल. तसेच इतर सुविधांचाही लाभ घेता येईल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

Web Title: Eknath Shinde Government Will Give Free Treatment To All Injurd Govindas In Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..