Eknath Shinde VS Sanjay Raut | आमदारांच्या अपहरणाचा राऊतांचा आरोप; बंडखोर शिंदेचं प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde VS Sanjay Raut
आमदारांच्या अपहरणाचा राऊतांचा आरोप; बंडखोर शिंदेचं प्रत्युत्तर

Eknath Shinde: आमदारांच्या अपहरणाचा राऊतांचा आरोप; बंडखोर शिंदेचं प्रत्युत्तर

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. हे बंड आता तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे ४० आमदार शिंदेंसोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच आमदारांचं अपहरण केल्याच्या संजय राऊतांच्या आरोपांना त्यांनी उत्तरही दिलं आहे. ( Shivsena leader Eknath Shinde replied to Sanjay raut's allegations)

हेही वाचा: Eknath Shinde Live: पुढची रणनीती ठरणार; बंडखोर आमदारांची काही वेळात बैठक

गुवाहाटीमध्ये आपल्या समर्थक आमदारांसोबत पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत, आणखी १० आमदार येणार आहेत, असा दावा शिंदेंनी केला आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (Eknath Shinde VS Sanjay Raut)

हेही वाचा: "शिवसेना आमदार पळून मुंबईला येत होते पण गुजरात पोलिसांनी मारलं"; राऊतांचा आरोप

तसंच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल शिवसेनेच्या या आमदारांचं अपहरण झालं असून त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला होता. मात्र एकनाथ शिंदेंनी हा आरोप फेटाळून लावला आहे. संजय राऊत आमचे नेते आहेत. आम्ही कोणत्याही आमदाराचं अपहरण केलेलं नाही. त्यांना मारहाण केलेली नाही. सर्व आमदार स्वखुशीने आमच्यासोबत आलेले आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

Web Title: Eknath Shinde Sanjay Raut Kidnapping Mlas Of Shivsena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanjay RautEknath Shinde
go to top