Eknath Shinde | सत्तेत येताच शिंदेंचा भुजबळांना दणका, ५०० कोटींची कामं थांबवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

सत्तेत येताच शिंदेंचा भुजबळांना दणका, ५०० कोटींची कामं थांबवली

छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत विकासकांसाठी 500 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी हा निधी वापरण्यात येणार होता. मात्र, मविआ सरकार कोसळल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीला ब्रेक लावला आहे.(EKnath Shinde Latest News)

रस्ते दुरुस्ती- पुनर्बांधणी, बंधारे दुरुस्ती, याच बरोबर लोक प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त विकास कामांचे प्रस्ताव, जिल्हा परिषद, जिल्हा विभागाकडे आलेले विकासकामांचे प्रस्ताव या सर्वांना विचारात घेऊन सर्व तालुक्यांना समान निधीचे वाटप करण्यात यावे आशा सूचना छगन भुजबळ यांनी केल्या होत्या.

मात्र, शिंदे यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर तत्काळ हा निधी गोठवण्यात आलाय. नव्या मंत्रीमंडळाच्या मंजुरीने ही कामं मार्गी लागतील, असं दिसतंय. (Chhagan Bhujbal)

आमदार सुहास कांदे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

Web Title: Eknath Shine Government Freezes Funds Approved By Chhagan Bhujbal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Chhagan Bhujbal