उमेदवाराला एवढाच खर्च करता येणार; एकही रकाना रिकामा ठेवल्यास अर्ज बाद

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. उमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्रात दोन पर्यवेक्षक पाठविले जाणार आहेत. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार येईल. उमेदवाराने एकही रकाना रिकामा ठेवल्यास अर्ज बाद करण्यात येईल. राज्यात 1.8 लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येईल. प्रचारसाहित्यात प्लास्टिकवर बंदी असेल. 

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आजपासून (शनिवार) आचारसंहिता लागू झाली असून, महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार हे निश्चित झाले. आज दुपारी 12 वाजता मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र आणि हरियानातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. उमेदवाराला 28 लाख रुपये एवढाच खर्च करण्यात येणार आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात 288 जागांसाठी मतदान होत असून, 8.94 कोटी मतदार महाराष्ट्रातून मतदानाचा हक्क बजावतील. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. उमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्रात दोन पर्यवेक्षक पाठविले जाणार आहेत. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार येईल. उमेदवाराने एकही रकाना रिकामा ठेवल्यास अर्ज बाद करण्यात येईल. राज्यात 1.8 लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येईल. प्रचारसाहित्यात प्लास्टिकवर बंदी असेल. सर्व उमेदवारांना आपल्या जवळील हत्यारे जमा करावी लागणार आहेत, असे अरोरा यांनी सांगितले.

अधिसूचना जारी झाल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सात दिवसांची मुदत, उमेदवारी अर्जांची छाननी, माघारीची मुदत, प्रचारासाठी 14 दिवसांचा कालावधी असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election Commission announces Maharashtra Vidhan Sabha 2019 Election dates