निवडणूक आयोगाकडून महिला पोलिसाचे कौतुक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

म्हसवड - नुकत्याच झालेल्या कऱ्हाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानादिवशी मतदान केंद्रावर बंदोबस्तावर असताना कर्तव्य चोख बजावल्याबद्दल महिला पोलिस कर्मचारी दया डोईफोडे यांचे निवडणूक आयोगाने एका लेखी पत्राद्वारे कौतुक केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने केलेले हे कौतुक पोलिसात सेवा करणाऱ्या विशेषत: महिला कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

कऱ्हाड पालिका निवडणुकीच्या मतदानादिवशी भारतीय जनता पक्षाचा एक वरिष्ठ नेता आपले चारचाकी वाहन घेऊन एका मतदारकेंद्रात जात असताना त्या केंद्रावर बंदोबस्तास असलेल्या कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी दया डोईफोडे (मूळ रा. पळशी, ता. माण) यांनी त्यांना मतदान केंद्रात जाण्यास मज्जाव केला. मात्र, संबंधित नेता काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. वास्तविक मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत वाहन नेण्यास मनाई असते. मात्र, "तो संबंधित नेता माझ्या गाडीला निवडणूक आयोगाच्या परवानगीचा परवाना लावण्यात आला आहे वगैरे' दावा करत होता. मात्र, त्यावर डोईफोडे या त्यांना नियम समजावून सांगत होत्या. पण, त्यांचे कुणीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. तेथील इतर अधिकाऱ्यांनीदेखील कानाडोळा केला. मात्र, या घटनेची चित्रफित सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यानंतर हे प्रकरण मीडियाने उचलून धरले. त्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन, या महिला पोलिस कर्मचाऱ्यास राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव डॉ. एस. एम. चन्ने यांनी पत्र पाठवून कर्तव्यदक्षतेबाबत कौतुक केले आहे. मात्र, या पत्रात त्या प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

Web Title: Election Commission appreciated the women police