विधानसभेची आचारसंहिता आजपासून; आज होणार निवडणुकीची घोषणा

election
election

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून (शनिवार) लागण्याची शक्यता आहे. कारण, आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून, यामध्ये राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार हे निश्चित आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीमध्ये मतदानाचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे. तसेच हरियानातील निवडणुकांच्याही तारखा जाहीर होतील. 

अधिसूचना जारी झाल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सात दिवसांची मुदत, उमेदवारी अर्जांची छाननी, माघारीची मुदत, प्रचारासाठी 14 दिवसांचा कालावधी, ही प्रक्रिया लक्षात घेता विधानसभेसाठी 18 ते 20 ऑक्‍टोबर या काळात मतदान होऊ शकते. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्‍यता असून, मतदानानंतर दोन दिवसांनी मतमोजणी होऊन निकाल होईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दिवाळीपूर्वी पार पडेल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करताना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच घेतली जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर सरकारचे निवडणुकीचे बजेट 18 कोटी रुपयांनी वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com