मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मुंबई - मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी विविध संस्था, संघटना, माध्यमे, विद्यापीठ आदींना आवाहन करण्यात आले असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; परंतु आता ही लोकचळवळ होण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठ व सीआयआय यांच्या वतीने मतदार दिनानिमित्त औचित्य साधून "मुंबई राईज, मुंबई वोट' या कार्यक्रमांचे विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, सीआयआयचे प्रदेशाध्यक्ष सुनील खन्ना, उपाध्यक्ष निनाद कर्पे आदी या वेळी उपस्थित होते. गेल्या अनेक निवडणुकांत मुंबईतील मतदानाचे प्रमाण कधीही पन्नास टक्‍क्‍यांच्या वर गेले नाही. हे वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध उपाययोजना राबविणार आहे. मतदार यादीत नाव असूनही मुंबईसारख्या शहरात 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदार मतदान करत नाहीत, हे फार मोठे आवाहन आहे. त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच युवक व महिला मतदारांनीदेखील मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करणे आवश्‍यक आहे. याकरिता मतदार जागृतीसाठी पारंपरिक पद्धतीबरोबरच सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला जाणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले.

Web Title: Election Commission to try to increase the percentage of voting